मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध आजपर्यंत 2500 व्यक्तींकडून वसूल केला 12 लाख 50 हजारांचा दंड


ठाणे(31): ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 2500 व्यक्तींविरूद्ध आतापर्यंत दंडात्मक करण्यात आली असून 12 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली.

      सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग सुरू असून देखील शहरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढतच आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन यांच्या आदेशानुसार महापालिका हद्दीतील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांसह ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ही कारवाई करण्यात आहे. 

      ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीमध्ये आतापर्यंत शहरात विना मास्क फिरणाऱ्या 2500 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये  नौपाडा प्रभाग समिती 468, वर्तकनगर प्रभाग समिती 354, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती 349, उथळसर प्रभाग समिती 280,  कळवा प्रभाग समिती 245, मुंब्रा प्रभाग समिती 185, लोकमान्यनगर प्रभाग समिती 240, वागळे प्रभाग समिती 184, आणि  दिवा प्रभाग समिती 195 व्यक्तींविरूद्ध कारवाई करून एकूण 12 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

      यापुढे देखील ठाणे महानगरपालिका हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालये तसेच मार्केट या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींविरूद्ध दंडात्मक करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकांकडून 500 रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image