महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे

ठाणे / भिवंडी / पालघर दि, १३ (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने पालघर आणि भिवंडी येथे संयुक्त छापे घालून नकली उत्पादने विक्रीचा पर्दाफाश केला. या छाप्यामध्ये पोलिसांनी या विक्रेत्यांकडून नकली टाटा वायरॉन काटेदार वायर सामग्रीची अनुक्रमे जवळपास ५४ आणि ७५ बंडले जप्त केली.  या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टाटा स्टील कंपनीचे ट्रेडमार्क्स, लोगो आणि इतर बौद्धिक संपत्ती यांचा गैरवापर आणि बेकायदेशीर उपयोग या विरोधात टाटा स्टीलने मोहीम सुरू केली आहे . अशा गैरप्रकारांमुळे सरकारच्या महसूल जमा करण्याच्या प्रयत्नांवर देखील विपरीत परिणाम होतो.
कंपनीच्या ब्रँडची प्रतिमा, ख्याती यांचे रक्षण करण्यासाठी टाटा स्टीलची ब्रँड प्रोटेक्शन टीम सातत्याने लक्ष ठेवून असते व कंपनीच्या नावाने नकली उत्पादने तयार करून आणि विकून कंपनीच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात सतत कारवाई करीत आहे .
भिवंडी में जब्त किए नकली टाटा वायरॉन कंटीले तार
 ठाणे / भिवंडी , ता. १३ :  ब्रांड और परिसंपत्तियों की सुरक्षा के लिए महाराष्ट्र पुलिस के साथ टाटा स्टील के जारी प्रयासों के तहत पालघर और भिवंडी में संयुक्त छापामारी कर नकली उत्पाद बेचने के फर्जीवाड़े को पकड़ा। छापेमारी के दौरान विक्रेताओं से नकली टाटा वायरॉन कंटीले तार की सामग्री के 54 और 75 बंडल जब्त किए गए। इस संबंध में एक एफआईआर दर्ज कराया गया है। टाटा स्टील अपने ट्रेडमार्क, लोगो और अन्य बौद्धिक संपदाओं के दुरुपयोग की कड़ी निंदा करता है। ऐसी जालसाजी सरकार के राजस्व पर प्रतिकूल प्रभाव डालती है। टाटा स्टील की ब्रांड प्रोटेक्शन टीम फर्जीवाड़ा करने वाले उन प्रतिष्ठानों के खिलाफ निरंतर निगरानी और कार्रवाई करती है, जो कंपनी के बौद्धिक संपदा अधिकारों का उल्लंघन कर रहे हैं।