कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच संस्थेच्या संचालक आणि अध्यक्षा सौ सुनिता ताई मोडक,
विवेक राणे - अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कल्याणी संस्था आणि प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, समाजसेविका सिद्धी विनायक कामथ - सांस्कृतिक विभाग उपाध्यक्षा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी मनिषा शिंदे - धुळे जिल्हा अध्यक्षा, सुनिल नांद्रे - उपाध्यक्ष व वकील, प्राजक्ता देसले - खजिनदार, रुचिता जोशी - कल्याणी संस्था ज्योती वरक मुबंई विभाग अध्यक्ष, प्रतिक कुलकर्णी -
व्यवस्थापक-समन्वयक महाराष्ट्र राज्य आणि सर्व मुबंई टीम तसेच इतर मान्यवर यां कार्यक्रमासाठी उपस्थित होते. ज्योस्त्ना कुलकर्णी उपाध्यक्षा महाराष्ट्र राज्य यांनी संस्थेच्या शाखेची जबाबदारी स्विकारली असून संपूर्ण महाराष्ट्र स्तरातून यां संस्थेचे तसेच कार्यकर्त्यांचे कौतुक केले जात आहे.