रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, 25 दिवसांत बदलणार Debit-Credit चा नियम

नवी दिल्ली : बँकिंग सेवा वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, नवीन वर्षात तुमच्या डेबिट (Debit) आणि क्रेडिटच्या (Credit) नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 25 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटच्या (Contactless Card Payment) नियमांनुसार बदर करण्यात येणार आहे. खरंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंटची मर्यादा वाढवली आहे. या बदलामुळे तुम्ही कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून 5000 रुपयांपर्यंत कोणत्याही पिनशिवाय सहज पेमेंट करू शकता. आतापर्यंत फक्त कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून पिनशिवाय जास्तीत जास्त 2,000 रुपये काढता येऊ शकत होते. पण आता याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.