महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 5 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.


मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधरच्या ३ आणि शिक्षक मतदार संघासाठीच्या २ जागांचा कार्यक्रम आघाडी सरकारने जाहीर केला असून यावेळीही काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं आजही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. 


औरंगाबाद मतदारसंघातून सतीश चव्हाण,नागपूरमधून अनिल सोले आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळ 19 जुलै 2020 रोजी संपला आहे. पुणे पदवीधरचे तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील कोथरुड विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता. यासर्व जागांवर निवडणूक होत आहे.


काँग्रेस विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागा लढवत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसनगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित वंजारी यांना संधी देण्यात आली आहे. अभिजित वंजारी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे पदवीधरसाठी अरुण लाड यांना तर औरंगाबादसाठी सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलीय.


भाजपनं पुणे पदवीधरमधून संग्रामसिंह देशमुख, औरंगाबाद मधून शिरीष बोराळकर, नागपूरमधील संदीप जोशी आणि अमरावती शिक्षकमधून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.


वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद मध्ये नागोरराव पांचाळ, पुणे मधून सोमनाथ साळुंखे, नागपूरमधून राहुल वानखेडे, पुणे शिक्षक मधून सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.


मतदारसंघनिहाय उमेदवार


पुणे पदवीधर


अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्रामसिंह देशमुख भाजप
प्रताप माने ( राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी )
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)


औरंगाबाद पदवीधर


सतीश चव्हाण (राष्ट्रवादी )
शिरीष बोराळकर (भाजप)
नागोरराव पांचाळ( वंचित)


रमेश पोकळे (भाजप बंडखोर)


नागपूर पदवीधर


अभिजीत वंजारी (कॉग्रेस )
संदीप जोशी( भाजप)
नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार )
राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )


पुणे शिक्षक


जयंत आसनगावकर ( काँग्रेस)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)
सम्राट शिंदे (वंचित)
डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)


अमरावती शिक्षक 


श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा
नितीन धांडे ( भाजप)
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती)
प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)


निवडणुकीचा कार्यक्रम


निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर
अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर
मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 )
मतमोजणी : 3 डिसेंबर
निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर


भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर


भाजप


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image