ठामपाने घेतल्या तीन कार्डियाक रूग्णवाहिका भाडे तत्त्वावर

 ठामपाने घेतल्या तीन कार्डियाक रूग्णवाहिका भाडे तत्त्वावर


ठाणे


ज्या रूग्णांना कार्डियाक रूग्णवाहिकेची आवश्यकता आहे त्यांना रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत असून आज तीन नवीन कार्डियाक रूग्णवाहिका महापालिकेने भाडे तत्त्वावर घेतल्या. दरम्यान अजून चार कार्डियाक रूग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.


      सद्यस्थितीत कोरोना कोव्हीड 19 साठी महापालिकेकडे एकूण 88 रूग्णावाहिका उपलब्ध आहेत. त्यापैकी 8 रूग्णावाहिका या कार्डियाक आहेत. यासंदर्भात अजून कार्डियाक रूग्णवाहिका वाढविण्याच्या सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या. याबाबत महापौर नरेश गणपत म्हस्के यांनीही या प्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि महापालिक आयुक्त विजय सिंघल यांच्यामध्ये चर्चाही झाली होती. त्या चर्चेनंतर तातडीने महापालिका प्रशासनाने ही कार्यवाही केली.      आजपासून अतिरिक्त 3 कार्डियाक रूग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्यात येत असून उर्वरित 4 कार्डियाक रूग्णवाहिका येत्या तीन ते चार दिवसात प्राप्त होणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.