श्री माँ ट्रस्टने जपला सामाजिक बांधिलकीचा वसा
ठाणे
नैसर्गिक आपत्ती असो वा अन्य कोणतेही संकट असो, सर्वसामान्यांना मदतीचा हात देणे हा श्री मॉं ट्रस्टचा स्थायीभाव आहे. सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येही संस्थेने आपला स्थायीभाव जपत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. परमपूज्य श्री तारा माँ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माँ ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील येऊर येथील पाचवड पाडा आणि पानखंडा येथील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
5 किलो तांदूळ, 5 किलो पीठ, 2 किलो तूरडाळ, 1 किलो मीठ, 1 लिटर तेल, 100 ग्रॅम मिरची पावडर आणि 100 ग्रॅम हळद या जीवनाश्यक वस्तूंचा यात समावेश होता. संस्थेचे चेअरमन बाळगोपाळ सर यांच्या हस्ते व पोलिस उपआयुक्त अविनाश अंबुरे, कासारवडवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर खैरनार, सहाय्यक पोलिस निरिक्षक रुपाली रत्ने, जहांगीर चौधरी, संस्थेचे सीईओ राजन सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे योग्यप्रकारे पालन केले.