आदिवासी पाडयातील शेकडो कुटुंबीयांनाअन्न धान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप



आदिवासी पाडयातील शेकडो कुटुंबीयांना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातुन 


अन्न धान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप



डोंबिवली


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढत असून तो रोखण्यासाठी कडक पाऊले उचलत संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे सर्व रोजगार आणि व्यवसाय ठप्प झाले असून गरीब व गरजू हाथावर पोट असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागात  देखील याचे पडसाद उमटले असून कामगारांसह रोजंदारीवर आदिवासी कुटुंबीयांची उपासमार होऊ नये यासाठी खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हजारो गरजू व हाथावर पोट असलेल्या गरीब नागरिकांना मदतीचा हाथ म्हणून मलंगगड परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबियांना अन्न धान्याचे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.


तसेच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवरील  शेकडो कुटुंबियांना तांदूळतूर डाळतेलसाखरमीठ इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून मागणीनुसार आणखी वस्तूंचे देखील मागणीनुसार वाटप करण्यात येईल असे आव्हान देखील खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.


त्याचप्रमाणे संपूर्ण मतदार संघातील वृद्ध सेवा संस्थाहॉस्पिटल कम वृद्धाश्रमकुष्ट सेवा संस्थाव इत्यादी संस्थांच्या मागणीनुसार त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा खा. डॉ. श्रीकांत शिंदे  यांच्या माध्यमातून प्रत्येक संस्थेस पोहच करत आहेत. त्यासाठी  सदर संस्थांनी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे पत्राद्वारे मनापासून धन्यवाद व्यक्त केले आहे.



 

 



 

Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image