ठाण्यातील आस्थापनांचा बहुतांश व्यवहार ठप्पच

परवानगी देऊनही ठाण्यातील बहुतांश व्यवहार ठप्पच


ठाणे


 ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने व उद्योग सुरु करण्याबाबतच्या सरकारी आदेशांत संदिग्धता असल्याने काही आस्थापनांना व्यवहार सुरु करण्याची परवानगी देऊनही बहुतांश व्यवहार ठप्पच होते. मागील २१ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आला आहे. तो आता ३ मे पर्यंत लागू असणार आहे. २० एप्रिल पर्यंत ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल त्या ठिकाणचे उद्योग तसेच इतर काही व्यवहार काही प्रमाणात सुरु करता येऊ शकतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. तसेच शासकीय कार्यालयात १० टक्के उपस्थितीला परवानगी दिली होती. परंतु ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १५० च्या घरात गेला आहे. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.


टोलनाके सोमवारपासून सुरु झाल्याने आनंद नगर टोलनाक्यावरील दोन लेन यासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी अवजड वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्या होत्या. महापालिकेतही १० टक्के कर्मचारी हजर नव्हते. कर्मचाऱ्यांचे प्रमाण तुरळक होते. शहरातील इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंदच होत्या. महापालिकेत १० टक्के कर्मचा यांची उपस्थिती मंजूर केलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. 



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image