दसऱ्याच्या दिवशी नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्डातर्फे हल्लाबोल मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीत काही अटी-शर्थींचं पालन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या वतीने देण्यात आले होते. परंतु, नियमांचं पालन न झाल्यामुळे सचखंड गुरुद्वारा बोर्ड सदस्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नांदेड : दसऱ्याच्या निमित्तानं काढलेल्या पारंपरिक हल्लाबोल मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (File a case against the nanded Gurudwara Board)
वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले याप्रकरणी अधिक तपास करतायत. हल्लाबोल मिरवणुकीसाठी उच्च न्यायालयाने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करावा, असे आदेश दिले होते, मात्र यावेळी मोठी गर्दी जमल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांची नांदेड गुरुद्वारा कमिटीकडून पायमल्ली करण्यात आली आहे.