त्या ५० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

त्या ५० जण निगेटीव्ह मात्र क्वारंटाईन



कल्याण


कल्याणमधील २५ जणांसह मुंब्रा येथील २५ बांगलादेशी व मलेशियन नागरिकांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सुटेकचा निःश्वास सोडला आहे. मात्र या सर्व ५० जणांना सध्या क्वारंटाइन करण्यात आले आहे.दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी होऊन परतलेल्या नागरिकांचा केंद्र आणि राज्य सरकारकडून शोध घेण्यात येत आहे. कल्याणातील २५ जण यात सहभागी होऊन परतल्याची माहिती मिळल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी महापालिकेच्या पथकासोबत एका फ्लॅटमधून या सर्वांना ताब्यात घेतले. या सर्वांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी सांगितले.


दुसरीकडे मरकजवरून २५ जण ठाण्यातील मुंब्रा येथे परतले असल्याचा संशयातून त्यांचेही थुंकीचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये बांगलादेशचे १३, मलेशियाचे आठ तर उर्वरित भारतीय होते. मात्र या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मरकजसंदर्भात आमच्याकडे पोलिस विभागाकडून आलेल्या यादीमध्ये त्यांची नावे नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.  बांगलादेशी, मलेशियन नागरिकांची माहिती न दिल्याप्रकरणी संबंधित ट्रस्टविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती, मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.