मिरा भाईंदर शहरात 15 रुग्नांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश
भाईंदर:
सोमवारी मिरा भाईंदर शहरात करोना बाधित 3 नव्या रुग्णांची भर पडली असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरातील एकूण रुग्णाची संख्या 145 एवढी झाली आहे.यात दिलासा दायक बाब ही की एकाच दिवशी 15 रुग्नांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे.
मिरा भाईंदर शहरातील करोना बाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे आढळून येत आहे. सोमवारी 3 नवीन रुग्ण समोर आल्याने शहरातील करोना बाधीत रुग्णांची संख्या आता 145एवढी झाली आहे. रविवारी आढळून आलेल्या अहवालात दोन पुरुष आणि एक महिला रुग्णाचा समावेश आहे. तसेच हे रुग्ण मिरा रोड येथील क्वीन्स पार्क, भाईंदर पूर्व येथील बीपी रोड आणि भाईंदर वेस्ट येथील उत्तन परिसरात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.