अखेर  कोपर पुलाचे बांधकाम महापालिकेने सुरु केले

अखेर  कोपर पुलाचे बांधकाम महापालिकेने सुरु केले




डोंबिवली


येथील कोपर पुलाचे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेता सदर पुलाचे बांधकाम तातडीची बाब म्हणून पालिका आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकारात म्हणजेच कलम ६७ क अन्वये करावे ही सातत्याने मी मागणी करत होतो. माझ्या मागणीप्रमाणे अखेर आज कोपर पुलाचे बांधकाम याच कलम ६७ क अन्वये पालिकेने सुरु केले.  त्याच सोबत महावितरणचे कल्याण विभाग मुख्य अभियंता यांना पत्र लिहून स्मरण करून दिले की  सदर कोपर पुलावरून डोंबिवली पूर्वेहून पश्चिमेकडे जाणाऱ्या विद्युत वाहिन्या महावितरण कंपनीने हलविण्यास राज्य सरकारमधील जबाबदार प्रतिनिधी आणि मुख्यतः कर्तव्यदक्ष डोंबिवलीकर म्हणून महावितरण कंपनीस ₹ १ कोटी २० लक्ष जिल्हा नियोजन समितीच्या द्वारे आपणास तात्काळ वर्ग केले होते. आजतागायत आपल्या महावितरण कंपनीने सदर विद्युत वाहिन्या हटविण्याचे काम केले नाही याची आठवण महावितरण कंपनीस करून दिली. आणि विद्युत वाहिन्या हटविण्याचे काम करण्यास सांगितले.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image