विजय सिंघल यांनी आज आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती


आज आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार



ठाणे


ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी विजय सिंघल यांची नियुक्ती झाली असून आज महापालिका भवन येथे त्यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.


      विजय सिंघल हे 1997 बॅचचे आयएएस अधिकारी असून त्यांनी आयआयटी रुड़की येथून बी.ई. (सिव्हिल)मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर आयआयटी दिल्ली येथून बिल्डिंग सायन्स अँड कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून लोक सेवा धोरण व व्यवस्थापन या विषयात एम.एससीचे शिक्षण पूर्ण केले आहे.


    श्री. सिंघल यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी, मलकापूर, बुलढाणा,  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद, हिंगोली जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, कोल्हापूर महापालिका आयुक्त, साखर आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, उद्योग आयुक्त आणि बृहन्मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे.  मुंबई महापालिकेमध्ये राबविलेल्या विविध डिजिटल उपक्रमांसाठी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते त्यांना "राष्ट्रीय डिजिटल ई-शासन पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. यासह सामाजिक व प्रशासकीय कार्यात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.