ठाण्यात प्रमुख ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारण्याची  मागणी
ठाण्यात प्रमुख ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारण्याची  मागणी

 


ठाणे 

 

 ठाणे मनपा हद्दीतील  रेल्वे स्थानकं, एस.टी.डेपो, बस आगार येथे आरोग्य तपासणी केंद्र उभारण्याबाबत विरोधी पक्ष नेत्या सौ.प्रमिला केणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.  जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूंच्या संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असताना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने योग्य पाऊले उचलली जात आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार आय.टी. क्षेत्रातील कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम अर्थात घरी बसून काम करण्याची मुभा दिलेली असल्याने मुंबई, पुणे तसेच नागपूर या शहरांतून कर्मचारी मोठ्या प्रमाणात ठाण्यात ये - जा करताना पहावयास मिळत आहेत. देशातील विमानतळांच्या धर्तीवर ठाणे मनपा हद्दीतील रेल्वे स्थानकं, एस.टी.वर्कशॉप, बस डेपो अशा ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र उभारल्यास कोरोना विषाणूच्या संसर्गापासून ठाणेकर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते असे मत ठाणे मनपा विरोधी पक्ष नेत्या सौ.प्रमिला मुकूंद केणी व्यक्त केले असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देखील दिले आहे.

 

याप्रसंगी प्रमिला केणी यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आवश्यकता नसल्यास तमाम ठाणेकर नागरिकांनी आपल्या घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले.

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image