गत २५ वर्षे धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने नविन वर्षाचे स्वागत रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्याची परंपरा अखंड सुरू आहे. नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी हा उपक्रम " रक्तानंद ग्रुप " च्या माध्यमातून सातत्याने सुरू ठेवला आहे.रक्तदान शिबिराला कोरोनाच्या काळातही तरुणांचा प्रचंड प्रतिसाद होता.शिबिरात युवा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी रक्तदान केले.तसेच स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांनाही रक्तदान केले. ३६ वेळा रक्तदान करणाऱ्या बदलापूर येथील सौ अर्चना विशाल सुराडकर या महिला रक्तदात्याला " रक्तकर्ण " पुरस्काराने गौरविण्यात आले.ठाणे जिल्हाप्रमुख व महापौर नरेश म्हस्के,आमदार रवींद्र फाटक,आमदार विश्वनाथ भोईर डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक व माजी महापौर सौ मीनाक्षी शिंदे,सौ विजयाताई पोटे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ चौधरी,स्थायी समिती सभापती संजय भोईर,परिवहन समिती सभापती विलास जोशी,माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष भूषण भोईर ठाणे शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख हेमंत पवार,उपशहर प्रमुख जगदीश थोरात,विभागप्रमुख कमलेश चव्हा ण,दीपक म्हस्के,बाळा गवस,राजेश मोरे,राजेश तावडे,अनिल सोनावळे,राजू मोरे,अरुण अवघडे,अजय मोरे,नारायण पाटील,कल्याण धुमाळ, सचिन बासरे महिला आघाडीच्या सौ वंदना डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिरात रक्ताच्या एकूण २३६ बाटल्या संकलित करण्यात आल्या. तलावपाळी जवळील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर वर्षाच्या शेवटच्या दिवशी रक्तदान शिबिराचा सामाजिक सोहळा संपन्न झाला.