बर्ड फ्ल्यू अत्यंत घातक; हायअ‍ॅलर्ट जारी करण्याची गरज: राजेश टोपे
 जालना: बर्ड फ्ल्यूचा डेथ रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राज्यात हायअ‍ॅलर्ट घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं. राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. बर्ड फ्ल्यूबाबत राज्यात हायअ‍ॅलर्ट देण्याची गरज आहे. कारण या आजाराचा मृत्यू दर 10 ते 12 टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे, असं टोपे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे बर्ड फ्ल्यूमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे आजाराचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने हायअॅलर्ट जारी करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.

 16 जानेवारीलाच लसीकरण

राज्यात येत्या 16 तारखेलाच कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. दररोज 10 हजार कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. तातडीची गरज म्हणून राज्याला 16 लाख लसींची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती द्यावी आणि कोणती देऊ नये हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, असं सांगतानाच कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या दोन लसींपैकी कोणती लस आपल्याला मिळणार आहे आज ना उद्या कळेल, असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image