नवी मुंबईत भर रस्त्यात विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकू हल्ला, आरोपी फरार

या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.


नवी मुंबई : नवी मुंबईत विक्रीकर अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावरून घरी परतणाऱ्या विक्रिकर अधिकाऱ्यांवर दोन अज्ञातांनी चाकूने हल्ला करून त्यांचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटून नेल्याची घटना सीबीडी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. (Knife attack on sales tax officer in Navi Mumbai)


मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात विक्रिकर अधिकाऱ्याच्या गळ्यावर आणि हातावर गंभीर दुखापती झाल्याने त्यांना सीबीडीतील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.



महेश बिनावडे असं विक्रीकर अधिकाऱ्याचं नाव आहे. ते सीबीडी सेक्टर-5 मध्ये वास्तव्यास असून सध्या मुंबईतील बांद्रा इथल्या कार्यालयात कार्यरत आहेत. बिनावडे हे सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले होते. सायंकाळी 7.30 वाजता ते कोकण भवन इथल्या बस स्टॉपवर बसने उतरून पायी चालत आपल्या घराच्या दिशेने जात होते. यावेळी दोन अज्ञात लुटारुंनी त्यांना अडवून त्यांच्याजवळचा मोबाईल फोन आणि पॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न केला.


यावेळी महेश बिनावडेंनी त्यांना विरोध केल्याने दोघांनी त्यांच्यासोबत झटापटी करून आपल्याजवळच्या चाकूने त्यांच्या गळ्यावर आणि डाव्या कोपरावर वार केले. यात एकाने त्यांचा मोबाईल फोन आणि पाकिट लुटून पळून गेले. या घटनेनंतर बिनवाडे यांनी जखमी अवस्थेत आपलं घर गाठलं. बिनवाडे यांना जखमी पाहताच त्यांच्या पत्नीने त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केलं.


या प्रकरणात सीबीडी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.





 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image