ट्विटर, फेसबुककडून ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक,

 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भडकाऊ ट्विटनंतर अमेरिकेत हिंसाचार उसळला. या सगळ्याला आता ट्रम्प यांना जबाबदार धरलं जातं आहे. त्यांचा विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पक्षासह रिपब्लिकन पक्षानंही ट्रम्प यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी आधीच या घटनेला राजद्रोह म्हटलं आहे, त्यामुळं राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली ट्रम्प यांना अटकही होऊ शकते. आणि त्यांना राष्ट्रपतीपदावरुन पायउतार होताच जेलमध्येही जावं लागू शकतं. जो बायडन हे मोठ्या मताधिक्यानं ही निवडणूक जिंकले आहे. अमेरिकेच्या दोन्ही सभागृहात त्यांचं बहुमत आहे, याच जोरावर ते कुठलंही ठराव पास करुन घेऊ शकतात. ज्याचा मोठा फटका ट्रम्प यांना बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरवर कायमची बंदी आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट बारा तासांसाठी, तर फेसबुक ने २४ तासांसाठी लॉक केले आहे. नागरी अखंडत्वाबद्दल नियम मोडणारे तीन ट्विट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी आणण्याचा इशारा ट्विटरने दिला. ट्विटर सुरक्षा टीमच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प आपले तीन ट्विट्स मागे घेत नाहीत, किंवा डिलीट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे अकाऊण्ट लॉक्ड राहील असं म्हटलं आहे. तर फेसबुकनंही डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंड काही काळासाठी बंद केलं आहे. फेसबुकवरुन त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं, मात्र, या आवाहनातून हिंसा जास्त भडकू शकते, असं फेसबुकनं म्हटलं, आणि ट्रम्प यांचं अकाऊंटच काही कालावधीसाठी ब्लॉक केलं. 



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image