बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष

 मृत पक्षांची माहिती तात्काळ देण्याचे महापौर-आयुक्तांचे आवाहन


ठाणे (११)  बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवू नये तसेच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने नियंत्रण कक्ष स्थापन केला असून नागरिकांनी मृत पक्ष्यांची माहिती मिळताच तात्काळ नियत्रंण कक्षाला कळविण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

देशात काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ आली आहेया पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने सतर्ककतेचा उपाय म्हणून नियंत्रण कक्ष निर्माण केला आहेया साथीमुळे नागरिकांनी घाबरून  जाता मृत झालेल्या पक्ष्यांची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्त यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगरानीखाली हा नियंत्रण स्थापन केला असून नागरिकांनी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथील टोल फ़्री -1800 222 108 तसेच 022 -25371010 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image