भुयारी मार्ग रुंदीकरण करण्याची मागणी

ठाणे : न्यू शिवाजी नगर,वाघोबा नगर,आनंद नगर,भोला नगर आदी परिसरातुन नवी मुंबई हद्दीत जाणाऱ्या मार्गावर हरबर लाईन व मध्य रेल्वे रूळ आहेत इथून क्रॉसिंग करण्यासाठी भुयारी मार्ग आहेत हे भुयारी मार्ग खूपच अरुंद असल्याने इथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत शिवाय वर्षानुवर्षे जुनी असलेली हि भुयारी मार्ग आता हळू हळू कमकुवत आणि बुझण्याच्या मार्गावर आहेत. या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करून इथून छोटी वाहने व नागरिकांना सुरक्षित पलीकडे जाण्यासाठी या मार्गांचे पुनर्निर्माण व रुंदीकरण करणे गरजेचं आहे असे येथील शिवसेना उपविभागप्रमुख मुकुंद ठाकूर यांनी वेळोवेळी येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले आहे परंतु अद्याप या प्रकरणी कोणतीही कार्यवाही रेल्वे प्रशासन करत नसून ठाकूर यांनी शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे याप्रकरणी पत्र पाठवून सदर समस्या निकालात काढणेबाबत विनंती अर्ज दिला आहे. शिवाय हा मार्ग झाल्यास कळवा नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.