यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठतर्फे मंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार

 

परिस्थीती व राजकारणातील व्यस्तता यामुळे अनेक वर्षे इच्छा असूनही शिक्षण पूर्ण न करता आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी ए पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याबद्दल मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन यानी माननीय मंत्री महोदयांची भेट घेऊन सत्कार केला यावेळी विद्यापीठाचे  रजिस्ट्रार ़डॉ. दिनेश बोंडे, मुबई विभागीय प्रमुख डॉ. वामन नखाले, सहायक रजिस्ट्रार टी.के. सोनावणे आदी उपस्थित होते.