ठाणे : कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक सेवाभावी संस्थेने मुंबई महाराष्ट्रातील गरजू जनतेसाठी मदत कार्य सुरू केले आहे ही कौतुकाची बाब आहे.
याच पार्श्वभूमीवर अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान जी गेल्या ११ वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेने आतपर्यंत महाराष्ट्रातील ठराविक आदिवासी पाड्यांवर व शहरी भागातील जवळ जवळ २५० ते ३०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलेले आहे.
इतकंच नव्हे तर हीं संस्था मेडिकल हेल्थ, आर्थिक मदत, शैक्षणिक मदत, विद्यार्थी गुण गौरव असे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत असते. सततच्या लॉकडाऊन मुळे आणि कोरोना सारख्या विषाणू महामारी मुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात शहरातील समाज देखील आपल्या कुटुंबासाठी दिवाळी फराळ करू शकेल की नाही अशी स्थिती आहे म्हणूनच अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने हीं गरज लक्षांत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील रे रोड येथे गरजूना संस्थेमार्फत दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख मान्यवर अतिथि प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री संजीवनी पाटील उर्फ वच्छी मालिका रात्रीस खेळ चाले, दिग्दर्शक-पत्रकार महेश्वर तेटांबे, अक्षरा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल वंजारे, सामाजिक कार्यकर्ते शेखर अडके आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष अमोल वंजारे यांनी उपस्थित मान्यवर अतिथि, हितचिंतक, देणगीदार तसेच संस्थेचे स्वयंसेवक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.