नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा विद्यापीठातर्फे सत्कार

 

ठाणे : राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या राजकीय, सामाजिक व्यस्त कामातून वेळ काढून त्यांचे  पदवीपर्यंतचे राहिलेले शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून नुकतेच पूर्ण करून बी.ए. पदवी मिळवली. त्यांच्या या जिद्दीबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. दिनेश भोंडे, मुंबई विभागीय संचालक डॉ. वामन नाखले. सहायक रजिस्ट्रार टि.के. सोनावणे आदी उपस्थित होते.