6 डिसेंबर च्या पाहणी दौऱ्यावर असताना जयस्वाल यांच्याकडून नियम धाब्यावर

 



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात आलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी काल गुरुवारी (3 डिसेंबर) पाहणी केली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पालिका उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, प्रसारभारतीचे डॉ. अश्विनी कुमार, पोलीस उपायुक्त प्रणय अशोक, पालिका माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक तथा सहाय्यक आयुक्त शरद उघडे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी संजीव जयस्वाल वगळता सर्व अधिकाऱ्यांनी मास्क लावून राज्य सरकार आणि पालिकेच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.