31 डिसेंबरला रजनीकांत राजकीय पक्षाची घोषणा करणार, नव्या वर्षात नवी सुरुवात...

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार राजीनिकांत येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात करणार आहेत. या वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार का?, असा प्रश्न सगळ्याच चाहत्यांच्या मनात घोळत होता. अखेर त्यांनी आज (3 डिसेंबर) या संदर्भात ट्विटरद्वारे त्यांनी माहिती दिली आहे.