अनधिकृत बांधकामांसाठी दरमहा 3 कोटी रुपयांची लाच घेणारा ठाणे महापालिकेतला तो अधिकारी

 

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोविड काळात अनधिकृत बांधकामानी डोके वर काढले. त्यामुळे आगामी काळात ठाणे काँग्रेसच्यावतीने अनधिकृत बांधकाम विरोधात आंदोलन पुकारण्यात येणार आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामाचा ठाणे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांला दर महिन्याला 3 कोटीचा हप्ता मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे