26 इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत, पर्यावरण रक्षणासाठी आदित्य ठाकरेंचं आणखी एक पाऊल

 

मुंबईः मुंबईच्या मरिन ड्राईव्ह येथे फेम 2 योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाला प्राप्त झालेल्या 26 इलेक्ट्रिक बसेस गाड्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. बेस्ट ताफ्यात 46 इलेक्ट्रिकल बस आहेत. या 26 नवीन इलेक्ट्रिकल बस बेस्टच्या ताफ्यात आल्यामुळे 72 इलेक्ट्रिकल बस रस्त्यावर धावताना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे.