मनसे कार्यकर्त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी : मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती.

 

मुंबई: मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेनं अॅमेझॉनविरोधात मोहीम उघडली आहे. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना काहीसा धक्का सलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. तेव्हा अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात खेचल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष केलं होतं. अॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image