सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे खासदार विनायक राऊत ट्रोल झाले आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन दिवस कोकणच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी मास्क परिधान केला होता. मात्र अचानक खासदार राऊत यांना शिंका आली आणि त्यांनी चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करून आपला हात नाकावर धरून शिंकले. त्यावरून आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे.
आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊतांवर हल्ला चढवला आहे.