पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. वडवली गावाजवळ काच वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने कंटेनराला मागून धडक जोरात धडक बसली. यामध्ये 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जखमींना तलासरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रात्री 3: 30 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
अपघात घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेत 3 जणांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून अपघाती वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू असून काच वाहून नेणाऱ्या ट्रकचं मोठं नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.