मुंबई : अंडरवर्ल्ड दाउदच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा आज अखेर लिलाव सुरू झाला आहे. त्याची रत्नागिरीतील हवेली 11 लाख 20 हजार रुपयांना विकण्यात आली असून इतर 17 मालमत्तांचा अजूनही लिलाव सुरु आहे. सेफमा अर्थात स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मैनिपुलेटर्स एजन्सीकडून हा लिलाव सुरु आहे.
ई-ऑक्शन सुरु आहे. त्यानंतर लोकांनी जे टेंडर भरले आहेत, ते उघडले जातील.
अशी माहिती सफेमाचे अतिरिक्त आयुक्त आर.एन. डिसोझा यांनी दिली.
नरिमन पॉईंट येथील सफेमा कार्यलयात दाऊदच्या रत्नागिरीतील प्रॉपर्टीचा लिलाव सुरु आहे. एकूण 17 प्रॉपर्टीचा लिलाव सुरु आहे. त्यापैकी 7 प्रॉपर्टी दाऊदच्या आहेत. तर एक प्रॉपर्टी इकबाल मिरची याची आहे. या 17 प्रॉपर्टीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
तीन पातळीवर हा लिलाव होणार आहे
- टेंडरद्वारे
- ई-टेंडरद्वारे
- ई-ऑक्शनद्वारे
लिलावात मुंबके गावातील (Mumbake Village Khed) स्थानिक शेतकरी सहभागी होणार नाहीत. स्थानिक इच्छुक बोली लावणारे मुंबईत जाणार नाहीत, अशी माहिती माजी सरपंच अकबर दुदुके यांनी दिली.
ACTच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासूनच सर्व प्रॉपर्टी दाखवायला सुरुवात केली होती. मुंबईमधील दाऊदच्या जवळपास सर्व प्रॉप्रटींचा लिलाव केल्यानंतर आता त्याच्या रत्नागिरीतील जमीन आणि घराचाही लिलाव होणार आहे. ही सर्व प्रोपर्टी महाराष्ट्रच्या रत्नागिरी खेड जिल्ह्यात आहे.
सेफमाचे संबंधित अधिकारी सय्यद मुनाफच्या माहिती प्रमाणे, “दाऊदच्या एकूण 17 प्रॉपर्टी शिल्लक आहे. त्यातल्या 8 प्रॉपर्टीचा लिलाव आज होणार आहे. कोरोनामुळे फक्त ई-ऑक्शन आणि टेंडर मार्फत लिलाव होणार आहे.
दाऊदच्या मालमत्तेच्या रकमा निश्चित
इब्राहिम दाऊदचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके आहे. दाऊदचे बालपण या गावात गेले. पण आता मोस्टवाँटेड डॉन म्हणूनही दाऊदचं नाव जगजाहीर करण्यात आलं आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाच्या रकमा निश्चित केल्या आहेत. यात दाऊदच्या मूळ गाव असलेल्या मुंबके गावातील मालमत्तेची रक्कम 14 लाख 45 हजार रुपये, तर लोटे येथील आंब्याच्या बागेची किंमत 61 लाख 48 हजार निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, दाऊदची मालमत्ता खरेदीसाठी मुंबके गावातील गावकरीच सरसावले आहेत.
दाऊदच्या मुंबकेमधील मालमत्तेचा दोन वेळा लिलाव जाहीर झाला होता, परंतु खरेदीसाठी कोणीही पुढे आले नाही, आता तिसऱ्यांदा लिलाव होणार आहे.
मुंबके गावातील दाऊदची प्रॉपर्टी
मुंबके गावातील प्रॉपर्टी दाऊदची आई अमिना कासकर यांच्या नावावर आहे. आई आणि वडील दोघेही हयात नाहीत. 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम फरार झाला. दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील प्रॉपर्टीचा लिलाव यापूर्वीच झाला आहे. आता कोकणातील प्रॉपर्टीचा लिलाव केला जाणार आहे. कोकणातील दाऊदच्या वडिलोपार्जित मालमत्ता दाऊदचे काका कसत आहेत. पण, आता लिलाव होत असेल तर सरकारच्या नियमांप्रमाणे व्हावे, अशी आशा दाऊदच्या काकांनी व्यक्त केली. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलाव हा अनेकांसाठी
उत्सुकतेचा विषय असतोच. त्यामुळे दाऊद इब्राहिमच्या प्रॉपर्टीचा लिलाव कोण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.