बिहारमध्ये एनडीएला 125 जागांवर बहुमत


पाटणा : तब्बल 18 तासांनी जाहीर झालाय. बिहार विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल अत्यंत चुरशीच्या या लढाईत ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. मात्र, अखेर भाजप-जेडीयूच्या एनडीएने विधानसभेच्या  एकूण 243 जागांपैकी बहुमताचा जादुई 122 आकडा गाठला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप-जेडीयूच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झालंय. दुसरीकडे 75 जागांवर विजय मिळवत तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, त्यांना सत्तास्थापनेसाठीच्या बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने 74 जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाची जागा घेतली. तर नितीशकुमारांचा संयुक्त जनता दलाने 43 जागांवर विजयाची नोंद केली. काँग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावं लागल.