ठाणे - काही वर्षांपूर्वी गळती लागलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी मिळत असून काही कारणास्तव पक्षातून निघून गेलेले कार्यकर्ते पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. ठाण्यात एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या महिला म्हणून ज्याची अशी ओळख आहे अश्या रेखाताई मिरजकर यांनी अनेक महिलांस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून स्वगृही परतल्याने आनंद झाला असल्याची भावना मिरजकर यांनी व्यक्त केली. 1995 साली युथ काँग्रेस मधून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर पक्षासाठी वाहून घेतल्यानंतर वरिष्ठांनी त्यांना प्रदेश काँग्रेसमध्ये स्थान दिली होते, मात्र काही कारणास्तव त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रदेश जनरल सेक्रेटरी यांची वर्णी लागली होती, मात्र त्या ठिकाणी देखील मिरजकर यांचे मन लागले नसल्याने काँग्रेसची विचारधारा असल्याने पुन्हा एकदा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ठरवले.
रेखा मिरजकर यांनी गेली 30 वर्ष राजकारणात काम केले असून काँग्रेस मध्ये असताना अनेक आंदोलने, सामाजिक उपक्रम, गोरगरीब नागरिकांना आर्थिक मदत तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मिरजकर यांचे मोलाचे योगदान आहे. राजकारण पेक्षा समाजकारण करण्यात त्यांनी जास्त महत्त्व दिले असून भविष्यात काँग्रेस पक्ष जी संधी देईन, जे जबाबदारी वरिष्ठ म्हणून देतील ती जबाबदारी स्वीकरून पक्षासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी दर्शवली आहे.
रेखा मिरजकर यांनी येणाऱ्या काळात काँग्रेसला अधिक उभारी देण्यासाठी पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान रेखा मिरजकर ठाणे उपाध्यक्ष पदी निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश कार्यकारणी कडे पाठवण्यात आला असल्याचे यावेळी ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी घोषणा केली असून लवकरच ठाणे शहर उपाध्यक्ष पदी रेखा मिरजकर यांना बहाल करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी केली.