गिरीश महाजन यांना कार्यकर्त्याकडून शिवीगाळ


जळगाव : जळगाव मध्ये भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसच या कार्यकर्त्याने एका भाजप पदाधिकाऱ्याच्या कारवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. मात्र हि व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याच पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेबद्दल ऑडियो क्लीप व्हायरल झाली आहे.