ऊसतोड कामगारांनो संप सुरूच ठेवा; आंबेडकरांचं आवाहन

पाटणा: ऊसतोड कामगारांच्या झालेल्या कराराला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. नातेवाईकांच्या युनियनबरोब झालेला हा करार असून हा करार आम्हाला अमान्य आहे. या करारातून ऊसतोड कामगारांच्या हातात काहीच पडणार नाही. या कराराव सह्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा करार मान्य करू नका आणि संप सुरूच ठेवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. (prakash ambedkar appeal to sugarcane workers to continue strike)



प्रकाश आंबेडकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पाटणा येथे आले आहेत. त्यांनी एका व्हिडीओ ट्विटद्वारे ऊसतोड कामगारांसाठी झालेला करार अमान्य असल्याचं म्हटलं आहे. पुण्याच्या साखर संकुलात झालेला करार हा नातेवाईकांच्या युनियन्सनी केलेला करार आहे. हा करार ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादम या सर्वांच्या विरोधातील आहे. या करारातून काहीही वाढ मिळालेली नाही. या करारावर सह्याही झालेल्या नाहीत. ऊसतोड कामगारांना नुसतंच वापरून घेतलं जात आहे. त्यामुळे करार मान्य करू नका. कामावर जाऊ नका. हा संप वाढवा, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा प्रश्न आणखी चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.




राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस आदी नेत्यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. त्यात ऊसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.


“ऊस तोड कामगार आणि संघटनांची बैठक पुणे येथे पार पडली. 2020 – 21 ते 2022 ते 2023 असा करार झाला आहे. यावर्षी 14 टक्के वाढ मिळणार आहे. सर्व संघटनांनी संप मागे घेतला आहे. कामगारांनी आपल्याला आपल्या ठरलेल्या कारखान्यांवर कामासाठी जावं”, असं आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी होतं. 


 




Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image