BMC Elections | 'बीएमसी' निवडणुकीत शिवसेनेशी युती नको, काँग्रेस स्वबळावर : रवी राजा


मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बीएमसी निवडणुकीत (BMC Elections 2022) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले असताना काँग्रेसमधूनच विरोधाचा सूर उमटला आहे. मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष रवी राजा (Ravi Raja) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राज्यात हातात हात घालून असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना बीएमसी निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जाणार, याची उत्सुकता आहे. 


मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. शिवसेनेसोबत युती करण्याची काहीही गरज नाही, असं वक्तव्य मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी ‘एएनआय’शी बोलताना केलं आहे.


काँग्रेसच्या महापालिकेतील गोटात काही अंशी शिवसेनेबद्दल नाराजीही आहे. आम्हाला शिवसेना विश्वासात घेत नाही म्हणून महापालिकेत राज्यासारखी महाविकास आघाडी होऊ शकली नाही, अशी नाराजी रवी राजा यांनी याआधीही बोलून दाखवली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायीसह इतर समिती निवडणुकात काँग्रेस सत्ताधारी सेनेविरोधात मैदानातही उतरली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले.


थोरातांकडून महाविकास आघाडीचे संकेत


मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते. लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढतील, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी आजच केला होता. त्यानंतर रवि राजांनी परस्पर विरोधी मत मांडत ट्विस्ट आणला आहे.


2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच शड्डू ठोकला आहे. भाजपने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. आता सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे इतर चार प्रमुख पक्ष कसे रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आहे. 


मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल



  • शिवसेना – 92

  • भाजप – 82

  • काँग्रेस – 30

  • राष्ट्रवादी काँग्रेस – 9

  • समाजवादी पक्ष– 6

  • एमआयएम – 2

  • मनसे – 1

  • अभासे – 1


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image