मुंबईविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात पराभूत झाल्यास चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असून केवळ औपचारिकता म्हणून उर्वरित सामने खेळावे लागतील.
शारजा, 23 ऑक्टोबर : आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची कामगिरी आतापर्यंत त्यांच्या गौरवाला साजेशी झालेली नाही. या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी याच्या संघाला अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. प्ले ऑफमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना आजच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. मुंबईविरुद्ध होणाऱ्या या सामन्यात पराभूत झाल्यास चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असून केवळ औपचारिकता म्हणून उर्वरित सामने खेळावे लागतील. त्यामुळे या सामन्यात धोनी आपल्या अनुभवी खेळाडूंवर भरोसा दाखवणार की नवीन तरुण खेळाडूंबरोबर जुन्या खेळाडूंना घेऊन विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार.