आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल- जिल्हाधिकारी

आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी


ठाणे


ठाणे जिल्हयातील अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद/ शहापूर, मुरबाड नगर पंचायत व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रामधीलप्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone) अस्तित्वात असलेल्या क्षेत्रात दि.३१ ऑगस्ट रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लॉकडाउन पुर्ववत स्वरुपात चालू ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.


या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबी, तातडीच्या वैद्यकीय सेवा व शासकीय कामकाज या व्यतिरिक्त सर्व बाबींवर प्रतिबंध लागू राहतील. कंटेनमेंटच्या बाहेरील क्षेत्रासाठी राज्य शासनाचे मिशन बिगिन अगेन आदेश दि.२९ जुलैनुसार वाढीव सवलती (Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown) लागू राहतील.


 त्याबाबतची काटेकोर अंमलबजावणी संबंधित नगरपरिषद/नगर पंचायत व ग्रामपंचायत यांनी करावयाची आहे.  शहापूर व मुरबाड नगर पंचायत व ग्रामीण क्षेत्रासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तसेच अंबरनाथ व कुळगांव-बदलापूर नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिकारी यांनी कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या विचारात घेऊन घोषित केलेल्या व सध्या अस्तित्वात असलेल्या कंटेनमेंट झोन मध्ये अत्यावश्यक बाबी वगळता Lockdown चे प्रतिबंध पूर्ववत लागू राहतील.


केंद्र शासनाचे Unlock-१ व २ आणि राज्य शासनाचे मिशन बिगिन अगेन आदेश वेळोवेळी लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार  कंटेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात विशिष्ठ बाबीना टप्प्या टप्प्याने सवलती घोषित (Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown) करण्यात आल्या आहेत. सदर आदेशानुसार साथ रोगाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी  स्थानिक परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे व विशिष्ट क्षेत्रात प्रतिबंध लागू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आलेले आहेत.  या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी ठाणे तथा  अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजेश नार्वेकर  यांनी स्पष्ट केले आहे.