शाळा सुरू करायची की नाही, केंद्राने मागविल्या पालकांकडून सूचना 

शाळा सुरू करायची की नाही


केंद्राने मागविल्या पालकांकडून सूचना 


मुंबई -


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा सुरू करायची की नाही, याबाबत देशातील 15 राज्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच आता केंद्र सरकारने शाळा कधीपासून सुरू करता येतील, याबाबत थेट पालकांची मते जाणून घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व राज्यांतील शिक्षण सचिवांना शाळा सुरू करण्याविषयी पालकांना काय वाटते, हे जाणून घेण्याची सूचना केली आहे.


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 15 जुलै रोजी सर्व राज्यांसोबत व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. बैठकीत शाळा सुरक्षा धोरणाविषयी चर्चा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात होत असल्याने शाळा न सुरू करण्याबाबत अनेक राज्यांनी भूमिका स्पष्ट केली. बैठकीनंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांतील शिक्षण सचिवांना पत्र दिले आहे.


 



Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image