नोकरी गेल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

नोकरी गेल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या


ठाणे :


ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका तरुणाने लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  विनोद गणेरी (२८) असे या तरुणाचे नाव असून त्याने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 


विनोद हा एका मार्केटिंग कंपनीत नोकरी करत होता. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने पोलिसांना दिली.शुक्रवारी त्याने हॉटेल आयलँडमध्ये एक खोली बुक केली होती. रात्री उशिरा हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले. खोलीतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याची बाब हॉटेल व्यवस्थापक यांना देण्यात आली. व्यवस्थापक यांनी बनावट चावीने दार उघडले असता विनोद हा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.ठाणे नगर पोलिसांनी विनोदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे. लॉकडाऊनमध्ये हॉटेल व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल आयलँडच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image