महापालिका आयुक्तांनी केला शिवाईनगर, गणेशनगर, वर्तकनगर, येवूरचा दौरा

महापालिका आयुक्तांची शिवाईनगर, गणेशनगर, वर्तकनगर, येवूरला भेट
फिव्हर सर्वेलन्स, साफसफाई व पावसाळी कामाची केली पाहणी


ठाणे


 महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज वर्तकनगर प्रभाग समितीचा दौरा करून शिवाईनगर, गणेशनगर, वर्तकनगर, म्हाडा कॅालनी, येवूर आणि उपवन परिसराची पाहणी करून तेथील स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला. या दौऱ्यामध्ये त्यांनी महापालिकेच्यावतीने सुरू असलेला फिव्हर सर्वेलन्स, साफसफाई आणि पावसाळी कामाची पाहणी केली.


      महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी शिवाई नगर, गणेशनगर, वत्रकनगर, म्हाडा कॅालनी आणि वर्तकनगर येथील डॅा. आनंदीबाई जोशी आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. रागिणी बैरीशेट्टी, तसेच दिशा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भास्कर बैरीशेट्टी आदी उपस्थित होते.


      त्यानंतर त्यांनी येवूर परिसराची पाहणी करून तेथील विविध पाड्यांना भेटी दिल्या. तसेच उपवन परिसराचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त डॅा. चारूशीला पंडीत, कार्यकारी अभियंता श्री. येमेलवाड आदी उपस्थित होते.