बेस्ट सर्वांसाठी टीएमटी फक्त स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी

बेस्ट सर्वांसाठी टीएमटी फक्त स्वत:च्या कर्मचाऱ्यांसाठी


ठाणे 


ठाणे महापालिकेने गुरुवारपासून १० दिवस संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन केले आहे. काही आस्थापना सुरु असल्याने लोकांना कामावर जावे लागत आहे. परंतु टीएमटीत नो एण्ट्री' तर वेस्टमध्ये सर्वांना प्रवेश देण्यात येत होता. त्यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या रोज १२० च्या आसपास बस रस्त्यावर धावत होत्या, परंतु लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केवळ ५५ बस रस्त्यावर उतरविल्या होत्या. त्यादेखील केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच चालविण्यात येत होत्या. इतर नागरिक बसमध्ये चढल्यास त्याला उतरविले जात होते. परंतु, बेस्टच्या बसमध्ये सर्वांना प्रवेश दिला जात होता.


तसेच सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय असताना जांभळीनाका आणि इंदिरानगर येथील मार्केट १ वाजेपर्यंत सुरू होते. इतर मार्केटमधील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या या दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला. लॉकडाऊन कालावधीत या दोन मार्केटला एक न्याय आणि इतर दुकानदार आणि मार्केटला दुसरा न्याय का, असा सवाल अनेक व्यापाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन सांगितले असताना आम्ही त्याला सहकार्य केले आहे. परंतु, जर अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर कोरोनाला रोखण्यात प्रशासन कसे यशस्वी होईल, असा सवाल काही व्यापारी आणि दुकानदारांनी केला.


लॉक़डाऊन मुळे अंतर्गत रस्तेही बंद होते, केवळ मुख्य मार्ग सुरू होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त होता, तर टीएमटी बसमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना प्रवेश नाकारला होता.  अंतर्गत रस्ते बंद लॉकडाऊनमुळे शहरातील रस्त्यावरील वाहतूक रेंगाळली होती. अंतर्गत रस्ते बंद होते. शहरातील मुख्य चौकात वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली होती.