एफडीएने दिलेल्या निर्देशानुसार अर्ध्या किंमतीत पीपीई किट उपलब्ध होणार


एफडीएने दिलेल्या निर्देशानुसार अर्ध्या किंमतीत पीपीई किट उपलब्ध होणार


ठाणे: 


ठाण्यातील अंबिकानगर परिसरात असणार्या स्वस्तिक रुग्णालयामध्ये ११ ते १७ जूनदरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. या रुग्णाच्या एकूण बिलापैकी तब्बल ४९ हजार ३५० रुपये पीपीई किटसाठी आकारण्यात आले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी पाचंगे यांनी अधिक माहिती घेतली असता पीपीई किटचा दर २३५० रूपये इतका आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे या प्रकरणी रुग्णालय आणि संबधित मेडिकलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका उपायुक्त विश्वनाथ केळकर आणि अन्न-औषध विभाग परिमंडळ एकच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांची भेट घेत निवेदनाद्वारे पाचंगे यांनी केली होती. त्यानुसार एफडीएने मेडीकलची तपासणी केली असून सध्या सबंधित मेडिकल २ हजार रुपये दराचे पीपीई किट १२०० रुपये दराने विकत असल्याचे पाचंगे यांना एफडीएने दिलेल्या पञात नमूद केले आहे. 


गोरगरीब रुग्णांना पीपीई कीट तिप्पट दराने विकून ठाण्यात खासगी रुग्णालयांकडून लूट सुरु होती. याप्रकरणी पालिका प्रशासन आणि एफडीएकडे मनसेने केलेल्या लेखी तक्रारीनंतर या लुटीला चाप बसला आहे. एफडीएने दिलेल्या निर्देशानुसार अर्ध्या किंमतीत पीपीई किट उपलब्ध होणार असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मनसेच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.  केवळ तक्रारीनंतर एकाच मेडीकलची तपासणी करुन एफडीएने न थांबता शहरातील विविध मेडीकलची तपासणी केल्यास सत्यता समोर येईल. मनसे याबाबत पाठपुरावा करत असून खासगी रुग्णालय आणि मेडिकलच्या लुटीचे बळी पडलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी मनसेकडे संपर्क साधावा, याबाबत प्रशासनाकडे योग्य पध्दतीने पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आवाहन संदीप पाचंगे यांनी केले आहे.



 


 



Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image