महापालिकेच्या बेड आणि ॲम्ब्युलन्स अलोकेशन ॲपचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

काॅन्टॅक्ट ट्रेसींग वाढवा; क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा


पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे व पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सूचना


महापालिकेच्या बेड आणि ॲम्ब्युलन्स अलोकेशन ॲपचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अनावरण


ठाणे


कोरोना बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे काॅन्टॅक्ट ट्रेसींग वाढविण्याबरोबरच महापालिकांच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील सुविधांचा दर्जा राखा तसेच त्या ठिकाणावरून लोकांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील महापालिका आयुक्तांना दिल्या.


दरम्यान यावेळी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने बनविण्यात आलेल्या ॲानलाईन बेड अलोकेशन व ॲमेब्युलन्स बुकिंग सिस्टम ॲपचे ना. आदित्य ठाकरे यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले. तसेच त्यांच्यावतीने प्रत्येक महापालिकांना ॲाक्सीजन काॅन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.


ना. आदित्य ठाकरे आणि ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालय येथे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक आणि ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भायंदर महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीस ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि मीरा भायंदर महापालिकेच्यावतीने कोरोना कोवीडचबाबतचे सादरीकरण करण्यात आले.


या बैठकीत बोलताना राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री ना आदित्य ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात काॅन्टॅन्ट ट्रेसींग करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर चाचणीची क्षमताही वाढविण्याच्या सूचना दिल्या.  ठाण्यातील कोवीड रूग्णालये, विलगीकरण कक्ष, रूग्णांना रूग्णांना पुरविण्यात येणारे वैद्यकीय व्यवस्थापन, डाॅक्टर्स आणि इतर मनुष्यबळ, रूग्णांना देण्यात येणारे भोजन, रूग्णवाहिका सेवा आदींचा आढावा घेतला. तसेच त्यांच्यावतीने प्रत्येक महापालिकांना प्रत्येकी पाच ॲाक्सीजन काॅन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.


यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनीही महापालिकांनी मोठ्या प्रमाणात काॅन्टॅक्ट ट्रेसींग करून त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवावे अशा सूचना केल्या. क्वारंटाईन सेंटरमधून रूग्णांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले.


 



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image