कोरोना काळात स्वस्थ राहण्यासाठी म्युजिक थेरपी परिणामकारक

 कोरोना काळात मानसिक व शारीरिक स्वस्थ व्यवस्थित राहण्यासाठी
म्युजिक थेरपी परिणामकारक ........ सामाजिक कार्यकर्ते संदेश कवितके


ठाणे


आज कोरोनासारखे महाभयंकर संकट संपूर्ण जगावर पसरले आहे. माणसं स्वतःच्याच घरात कैदी म्हणून आहेत. प्रशासन सर्वांनाच शारीरिक काळजी घेण्यास सांगत आहे परंतु या काळात शारीरिक सोबत मानसिक काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे. घरात थांबणारे आणि बाहेर पडणारे सर्वच लोकांसाठी मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी music therapy  हा एक प्रभावी उपाय आहे मत सामाजिक कार्यकर्ते संदेश कवितके यांनी व्यक्त केले आहे.

आज सभोवतालची परिस्थिती अत्यंत भीतीदायक आहे त्यामुळे आपल्याला कोरोना झाला आहे या भीतीनेच लोक अर्धी लढाई हरल्याचे चित्र आपल्याला दिसते. कोरोना झालेल्या रुग्णांना रुग्णालयात वेगळे ठेवले जाते. तिकडे काम करणारे डॉक्टरांपासून सर्वच  कर्मचारी हे प्रचंड तणावाखाली दिसून येतात. म्हणूनच क्वारंटाईन सेंटर तसेच कोरोना रुग्णालयांमध्ये music player वर music therapy चालू करण्याची मागणी मी प्रशासनाला करत आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेले तसेच उपचार करणारे दोघांनाही याचा फायदा होईल. मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहिले तर शरीर देखील त्यास सकारात्मक साथ देईल. आपण हे विसरून चालणार नाही की PPE किटच्या आत एक माणूस आहे  आणि त्याला एक मन आहे. जे संक्रमित रुग्ण आहेत त्यांची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळली आहे त्यांच्यासाठी फक्त गोळ्या औषधांच्या पलीकडे देखील विचार व्हायला हवा.

लगान चित्रपटातल्या सामना हरण्याच्या भीतीने मनातून घाबरलेल्या गांवकऱ्यांसारखी अवस्था झाली आहे आपली. आपल्याला देखील आता उदीत नारायणच्या आवाजातील 'ओ   पालन हारे' सारख्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या गाण्याची गरज आहे. जेंव्हा उदित नारायणच्या आवाजात "जग के जो स्वामी हो.. इतनी तो अरज सुनो" म्हणतात तेंव्हा जे मनात घडतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की  सर्व रुग्णालय, कोव्हीड सेंटर्स मध्ये music therapy ची व्यवस्था व्हावी. सध्या मानसिक स्वास्थ्य देखील तेवढेच महत्वाचे आहे.


 18 व्या शतकातील बर्थोल्ड नावाच्या जर्मन कवी एकदा म्हणाला होता की   "Music washes away from the soul the dust of everyday life". संगीत तुमच्या मनावरील धूळ काढून टाकतं.माझ्या ओळखीत एक काका होते , सैन्यातून निवृत्त झालेले. सैन्यात असल्यामुळे त्यांची शिस्त देखील कडक. आमच्या बाजूने चालत गेले तरी मनावर एक प्रकारचं दडपण यायचं त्यांचं. हे कधी हसले असतील का? कधी कुणाशी छान बोलले असतील का? असा प्रश्न त्यांच्याकडे बघून मनात येई. एकदा काही कामासाठी मी त्यांच्या घरी गेलो आणि तिकडे मला ते त्यांच्या जुन्या म्युझिक प्लेयरवर निवांतपणे गाणी ऐकताना दिसले. किशोरदांच 'मेरे मेहबूब कयामत होगी' हे गाणं ऐकताना त्यांचा चेहरा वेगळाच होता. जो आजपर्यंत कधीच पहिला नव्हता. मी त्यांच्याकडे बघतोय हे त्यांना समजल्यावर ते माझ्याकडे ते गाणं गुणगुणतच हसले. मला धक्काच बसला. त्यांच्यासोबत मग जरा गप्पा झाल्यावर समजलं की हा माणूस दिसतो त्याहून खूप वेगळा आहे. आणि त्यांचं हे वेगळेपण हे  संगीतावरील असलेल्या प्रेमामुळे होतं. काका सैन्यात असताना देखील रेडिओ वर अशीच गाणी ऐकायचे. तेंव्हा मला संगीताची ताकद पहिल्यांदा अनुभवाला आली की दगडासारख्या माणसाला पाझर फोडणारी कोणती गोष्ट असेल तर ती संगीत.