लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांनाच अधिक

लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांनाच अधिक



ठाणे


 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र या निर्णयाचा कोणताही फायदा कोरोनाची संख्या कमी करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून जे लॉकडाऊन राबविण्यात आले त्याचा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग झाला हेच समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापा यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत.


मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रस्त्यांवर कोणीच दिसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र गेल्या तीन आठवड्यात प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन राबवण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. केवळ दकाने बंद ठेवून प्रशासन लॉकडाऊनचे यश शोधण्याच्या मागे लागले आहे. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कितपत यश येईल याची शाश्वती खुद्द प्रशासनही देऊ शकत नाही.शहरात लॉक डाऊन शिथिल झाल्यावर व्यापा यांना एक दिवसाआड दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. असे असूनही रुग्णांच्या संख्येत वाढच झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करून लॉकडाऊनबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.