ठाण्यातील सुमारे ४ हजाराहून अधिक पोलिसांची आरोग्य तपासणी
ठाणे
ठाणे पोलीस आयुक्तालय आणि भारतीय जैन महासंघ, देश अपनाये, एमसीएचआई-क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जून ते 10 जुलै या कालावधीत मोबाईल डिस्पेंसरी सेवा सुरू करण्यात आली होती. आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या 35 पोलीस ठाण्यातील सुमारे 4 हजाराहून अधिक पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत कोरोना लक्षणे आढळलेल्या 431 पोलीसांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 114 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्याने या पोलिसांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली. कोरोना काळातील पोलिसांच्या सेवेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. असे असले तरी या महामारीची सर्वाधिक झळ पोलिसांना पोहचत आहे. ठाण्यातही कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.