ठाणे महापालिका क्षेत्रात सात हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद

ठाणे महापालिका क्षेत्रात सात हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद



ठाणे 


ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ५ हजार ७०५ रूग्ण उपचार घेत असून ७ हजार १२९ कोरोना रूग्ण बरे झाले तर ५०८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ६ हजार २६९ रूग्ण उपचार घेत असून ६ हजार ३५५ बरे झाले तर १८९ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ४९० रूग्ण असून ५ हजार ६५२ बरे झाले तर ३०३ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार २६४ रूग्ण उपचार घेत असून ४ हजार ११३ कोरोनातून बरे झाले तर १९१ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये १ हजार ९४१ रूग्ण असून २ हजार १९२ बरे झाले तर ६७ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ८४६ रूग्ण उपचार घेत असून १ हजार ७९० कोरोनातून बरे झाले तर १४६ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ४९८ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून २ हजार ७१ बरे झाले तर १०५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ७६२ रूग्ण असून ६११ कोरोनामुक्त झाले तर २० जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ८४३ रूग्ण असून १ हजार १५७ बरे झाले तर ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २२ हजार ६१८ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत १ हजार ६१६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ हजार ७० रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ५५ हजार ३०४ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत.