स्थायी समिती सभा प्रत्येक्ष केवळ व्हिडीओ कॉन्फरसद्वारे न घेता पालिकेच्या सभागृहातही घ्यावी
- ठाणे शहर (जिल्हा ) काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी
ठाणे
ठाणे महानगर पालिकेची ३१ जुलै रोजी होणारी स्थायी समिती सभा केवळ व्हिडिओ कॉन्फरसद्वारे आयोजित न पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहातही प्रत्येक्ष आयोजित करण्यात यावी अशी मागणी ठाणे शहर(जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य, पालिका काँग्रेस गटनेते विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. आज ठाणे शहर ( जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना पत्र लिहून प्रत्येक्ष देखील सभेचे आयोजन करण्याची मागणी केली आहे.
कोव्हिडं संदर्भात शासनाने आखून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून या अगोदर देखील विविध पालकमंत्री, विरोधीपक्ष नेते यांच्या पत्रकार परिषदा, सभा संपन्न झाल्या आहेत.त्याचप्रमाणे स्थ्यायी समिती सभा देखील घेता येईल अशी मागणी ठाणे शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. ज्या सदस्यांना प्रत्येक्ष सभागृहात येऊन बैठकीत सहभागी होता येणार नाही त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे सभेला सहभाग दर्शवावा मात्र सरसकट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेचे आयोजन करू नये अशी मागणी श्री.चव्हाण यांनी केली आहे.